ट्रेक गोरखगडाची...
आमचा सगळ्यात जलद कोणता प्लान बनला असेल तो म्हणजे गोरखगड ट्रेकचा. आमची ट्रेकसाठी पूर्वतयारी अशी काही नसते. ट्रेक पँट, टी शर्ट , खायला काहीतरी , सगळ्यात महत्वाचे पाणी एवढ्या गोष्टी जमल्या की मावळे तयार.
२३ डीसेंबर, २०१७ हा दिवस ढाक बहीरीच्या ट्रेकप्रमाणे आमच्या आयुष्यात लक्षात राहण्याजोगा ठरला. या महीण्यात आम्ही सगळ्यात कठीण २ ट्रेक्स पूर्ण केल्या.
त्याही एकापेक्षा एक कठीण. आमचाच विश्वास बसत नाहीये गोष्टीवर. असो.
मी, अंकुश, रोहन, कल्पेश आणि आकाश असे पाच जण सकाळी ७.३० वाजता कल्यान स्टेशनला जमलो. तिथून मुरबाड जायचे होते. मुरबाडला जायला बसेस खुप असतात , पण सलग तीन सुट्ट्या लागून आल्यामुळे बस स्टँडवर खुपच गर्दी होती. शेवटी ८ वाजता एका बसमध्ये शिरलो. बसायला सीट नव्हत्या. कल्याण ते मुरबाड हा प्रवास उभ्यानीच करावा लागला.
मुरबाडला पोचलो तेव्हा सकाळचे ९.१५ वाजले होते. तिथून डेहरी या गोरखगड पायथा गावात जायचे होते. मुरबाड वरून डेहरी हे अंतर अंदाजे २४ किमी आहे तसेच मुरबाडहून तिथे जायला दिवसभरात बसेस पण कमी आहेत . आम्हाला नियोजीत बस चुकल्यामुळे खाजगी वाहणाने जाणे प्राप्त होते.

डेहरी गावात पोहोचलो तेव्हा १० वाजत आले होते. डेहरी गावातूनच गोरखगड आणि मंच्छिद्रगडचे सुळके मोठ्या दिमाखात उभे असलेले दिसत होते आणि त्यांच्या पाठीमागे पाठीराखा सिद्धगडही लक्ष ठेऊन होता. सिद्धगडाचे खरं विशाल दर्शन गोरखगडाच्या पारथ्याशी गेल्यावर झालं.
सकाळी दहा वाजता ट्रेकला सुरूवात केली. डेहरीगावात गोरक्षनाथांचे सुंदर मंदीर आहे मंदीच्या आवारातून , बाजुनेच गडाकडे जायला वाट आहे. गडाकडे जाणारी वाट चांगली आहे. थोडं चालले की चढण सुरू होते. चढण तीव्र होती. ही चढण गोरक्षनाथांचे तपश्चर्या स्थान येईपर्यंत तशीच राहते. थांबायचे झाले तर चढणीलाच थांबावे लागते. आम्हाला तपश्चर्या स्थानापर्यंत पोहोचायला दिड तास लागला. वाटेत जाताना खुप सुंदर जागा आहेत जिथे फोटो काढायचा मोह आवरत नाही. ट्रेक छोटी असल्यामुळे आही पण आरामात जात होतो.
गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. मच्छींद्रगडावर आता कोणी ट्रेकला जात नाही कारण काळे भुंगे हल्ला करून रक्तबंबाळ करतात , असं आम्हाला गडाच्या पारथ्याशी असलेल्या मंदीरात सांगण्यात आले. गोरखगड हे नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवार्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. मुरबाड तालुक्यातील वैशिष्टपू्र्ण आकारामुळे लक्ष वेधून घेणारे दोन गड " मच्छींद्रगड आणि गोरखगड, परंपरेने मच्छींद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरू शिष्यांची नावे ह्या दोन गडांना लाभली आहेत. सह्याद्रीच्या घाटवाटांवर नजर ठेवण्याऱ्या या २१३५ फुट उंचीच्या या गोरखगडाच्या पायथ्याशी गोरक्षनाथांचे मंदीर आहे. मंदीराच्या समोर तीन दगडी पाट आहेत त्यावर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ तपश्चर्येला बसायचे. मंदीराचा परीसर अतिशय सुंदर आहे. तिथे वर्षाचे बारा महीने, रात्रं दिवस एक दिवा तेवत असतो.

गोरक्षानाथांच्या मंदीरापाशी थोडावेळ विश्रांती करून आम्ही गोरखगड चढाईला सुरूवात केली. आमचा इथून खरा कस लागणार होता. समोर गोरखगडाचा कातळकडा आ वासून उभा होता. गोरखगडाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचायला पण दगडातील कठीण चढाई पार करून जावी लागणार होती . त्या वाटेतून चढताना जस जसे वर जात होतो तसे मागे दरीत वळून पाहायला अंगावर काटा येत होता. तसेच ठीकठीकाणी प्रस्तररोहणाला दोर अडकवण्यासाठी कड्याला लोखंडी हूक बांधले होते. धीर सोडून चालणारं नव्हते. हळू हळू का होईना, पाचही जण शेंदूरी कलर दिलेल्या गोरखगड दरवाज्यात पोहोचलो. तिथून मागे वळून पाहील्यावर नजर न पोचणारी दरी आणि सगळे काही व्यवस्थित होईल अशा मानवी चेहऱ्याच्या आकारातील ( सिद्धगडाचा एक भाग कपाळ, डोळे आणि तोंड या आकाराचा आहे) सिद्धगडाचा एक भाग धीर देत होता. गोरखगडाच्या दरवाज्यातून सिद्वगडाचे दर्शन खुपच मोहक दिसते. या दरवाज्या समोर काही आधार नाही, एकदम दरीचं एक्स्पोजर आहे दरवाज्यातून पुढे लगेचच दगडातील कोरीव पायऱ्या आम्हाला वर घेवून गेल्या. तिथेच वर ब्राह्मी लिपीत काही शिल्प कोरलेली आहेत.
दरवाज्यातून इथे आल्यावर पुढची अवघड चढाई बघून आमच्यातील एकाने ट्रेकमधून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्याच्या कडे आमच्या बँगा ठेवून आम्ही पुढचा मार्ग धरला. एक अवघड पँच पार करत वर गेलो. त्या पुढील अतिविशाल गुहेपर्यंतची चढाई काहीशी सोपी होती. दगडी पाय-यांचा पॅच लवकरच पूर्ण करून किल्ल्याच्या माथ्याच्या पायथ्याजवळ म्हणजे मुख्य सुळक्याच्या प्रारंभिक उंचीवर पोचलो. तिथेच गोरक्षनाथांची मुख्य गुंफा आहे. समोर जवळच मच्छिंद्रगड मोठ्या दिमाखात उभा दिसत होता आणि बाजूला सर्वत्र नितांत सुंदर नजारा आणि दरी आसपास सर्वत्र सह्याद्रीचे पर्वत सखे दिसत होते. इथे बरंच दगडी बांधकाम केलं आहे. इथल्या गूहेमध्ये रात्री मुक्कामसुद्धा करता येतो. गुंफा बरीच मोठी आहे. इथे सर्वत्र मर्कटांचा वावर आहे. गडावरच एका बाजूला गोड्या पाण्याचं टाकंसुद्धा आहे. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा ‘मच्छिंद्रगड’ निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत. पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

आता खरे कसब पणाला लागणार होते. गुहेकडून भयाण दरीच्या बाजूने निमुळत्या वाटेने थोडा वळसा घालून पुढे गेल्यावर गडाच्या माथ्यावर जायला एक कातळात कोरलेली वळणावळणाची शिडी दिसते आणि काळजात धस्स होते. शिडी अशासाठी बोलतोय की ८५ डीग्री मधील कोरलेल्या पायऱ्या शिडीसारख्याच वाटतात. इथे आमच्यातल्या एकाची दुसरी विकेट पडते. तो आपली निवृत्ती जाहीर करतो. उरतो आम्ही फक्त तीन ट्रेकर्स.
गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणार्या वाटेने पुढे जावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५० पायर्या खोदलेल्या आहेत. ५० पायर्यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चढावे लागते. बऱ्याच पायऱ्यांना हाताने पकडता येईल अशा खाचा केलेल्या आहेत. त्याचा त्या पायऱ्या चढताना खुपच फायदा होता. काही पायऱ्यांचा चढाई थरार अनुभवल्यानंतर पुढे कड्यातच कोरलेले अवघड वळण लागते ते कसे पार केले असेन ते मी शब्दात नाही सांगू शकत. अशा वेळी आमच्यासाठी आमचा परम मित्र अंकुश पिलाने हा आधार ठरला आहे. त्याने ज्या चपळाईने आणि कल्पकतेने पाय टाकले तेच अनुकरण मी केले आणि पुढचा टप्पा सरळ पायऱ्याचा असला तरी मागील दरी काही पिच्छा सोडत नव्हती आणि ८५ डीग्रीची चढण. पण सर्व पार करत गोरखगडावर पोचलो होतो. बरोबर १ वाजता आम्ही गोरखगडाच्या माथ्यावर पाय ठेवले होते.
चढताना दगडी वाट मध्ये मध्ये वळण घेते आणि दगडी वाटेची रुंदी अत्यंत कमी ( कुठे कुठे तर जेमतेम एक फूट आणि कुठे कुठे तर त्याहून थोडी व मोठी गॅप असलेली) आहे. दगडामध्ये अनेक ठिकाणी खोबणी व खाचा आहेत. बाहेर आलेले काही दगड व दगडाचा भाग आहेत. त्यावर पाय आणि हात ह्यांना होल्ड करून वर चढायला लागते.
आम्ही जेवढ्या काही ट्रेक केल्यात त्या वरून काही गोष्टी समजल्या. म्हणजे चढताना जास्तीत जास्त भार पायांवर आणि पायाच्या बोटांवर द्यायचा. हातांवर भार घ्यायचा नाही, हात फक्त दगडांना धरून आधार देण्यासाठी आहेत. आपल्या हातांना आपलं वजन फार वेळ घेता येत नाही. कारण आपल्या हाताच्या बोटांमध्ये तेवढी ताकत नसते. पण आपण आपल्या पायांवर जास्त वजन देऊ शकतो. कारण त्यामध्ये ती ताकत असते व आपण दिवसभरात दोन तास तरी आपल्या पायांवरच असतो. उतरताना ज्या स्थितीमध्ये चढलो, तसंच म्हणजे दरीकडे पाठ करून उतरायचं आहे. सरळ उतरण्याचा प्रयत्न करायचे नाही . अशा बऱ्याच गोष्टी होत्या पण मनामध्ये प्रचंड धाकधुक होती. कारण कितीही काळजी घेतली तरीही एक्स्पोजर जरा जास्तच होतं. मनाशी विचार केला, आधीच इतकं वर आणि इतकं धोकादायक प्रकारे आलो होतो. खाली जाताना फुल वाट लागणारच आहे. तिथे काही बदल होणार नव्हता.

जेव्हा माथ्यावर पोहोचलो तेव्हा सह्याद्रीच्या अनेक डोंगरांची रांग दिसत होती. समोरच मच्छिंद्रगड दिसत होता , पण तो आता बुटका वाटत होता. दूरवर खाली कित्येक अंतर दूरवर सपाट जमीन आणि रस्ता दिसत होता. एका बाजूला सिद्धगड आणि आसपासची डोंगररांग दिसत होती.
गडाच्या माथ्यावर चक्क एक छोटं मंदीर बांधलेलं होतं. ते कसं बांधले असेल त्याची कल्पनाच करवत नाही . मंदीरात रोज पुजा होते हे महादेवाच्या पिंडीवर घातलेल्या ताज्या फुलानी आणि पिंडीसभोवतालच्या जागेवरून दिसून आले. मंदीराच्या आसपास काही झाडं लावलेली आहेत. एक नारळाचे रोपटे बघून खुपच बरं वाटले. एवढ्या उंचावर आपल्या सोबत कोणीतरी असल्याची भावना त्या रोपट्यामुळे आली. गडाच्या माथ्यावर मात्र बसण्यासाठी (सुरक्षित) जागा होती. तिथे थोडावेळ बसलो आणि उतरायला सुरूवात केली.
उतरताना कसे उतरणार याचीच धाकधुक होती. मी उतरण्यासाठी सगळ्यात पुढे लागलो. हळु हळु वळून आणि दरीकडे पाठ करून उतरण्यास सुरुवात केली. तीन ठीकाणी धोकादायक वळणावर पायऱ्या पार धोकादायक होत्या जेमतेम एक पाय राहील एवढ्या रूंदीच्या पायऱ्या होत्या. वरच्या बाजुला तर पायऱ्यानांच खाचा करून हँडलसारखे कोरले आहे त्याचा उपयोग खुपच झाला. हा पॅच चढताना उतरताना एका छोट्या गुहेपाशी आपण थांबू शकतो. ते एक दिलासा देणारे होते. पण मागची दरी काही मनातली भीती पूर्ण पणे घालवत नव्हती. हळू हळू पाय-या आणि त्यात कोरलेल्या खाचांवर लक्ष ठेवत अवघ्या १५ मिनिटात आम्ही खाली उतरलो. माझ्या मागोमाग अकुश आणि त्याच्या मागे आकाश असे एक एक सर्व खाली उतरलो. उतरल्यावर आमचा आनंद पार गगणात मावेसा झाला. आरोळ्या ठोकत आनंद व्यक्त केला. हा अवघड पँचपुढे पुढील उतरन सोपी वाटू लागली होती. तरी पण पूर्णपणे काळजी घेत पायथ्याशी आलो. गोरक्षानाथांच्या मंदीराच्या समोरच्या प्रांगणात जेवायला बसलो. जेवन झाल्यावर पुढील तासाभराची वाट उतरून ट्रेक पूर्ण केली.
दऱ्या, खिंडी, घनदाट जंगलातील वृक्षवल्ली व पशुपक्षी या सर्व आकर्षणापायी इतिहास निरीक्षण जिद्द आणि साहसाची भूक भागावणाऱ्या या दुर्गम बिकट वाटांमधील गोरखगडावर दुर्गरोहींची पावले आपोआप वळतात.

शब्दांकण - नितीन राणे
९००४६०२७६८
९००४६०२७६८
No comments:
Post a Comment